YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहे. 46

46
1प्रभू परमेश्वर असे म्हणतो, आतल्या अंगणाचे पूर्वेकडचे दार कामाच्या सहा दिवसात बंद असेल. पण शब्बाथ व चंद्रदर्शन या दिवशी ते उघडले जाईल. 2अधिपती, त्या द्वाराच्या द्वारमंडपाच्या वाटेने बाहेरून आत येईल आणि तो द्वाराच्या खांबाजवळ उभा राहील तेव्हा याजक त्याचे होमार्मण व शांत्यर्पण करील. मग त्याने दाराच्या उंबरठ्यावरून परमेश्वरास दंडवत घालून बाहेर जावे. पण द्वार संध्याकाळपर्यंत बंद केले जाणार नाही. 3देशातील लोकांनी शब्बाथ व नवचंद्रदिनी या दोन दिवशी दारातूनच परमेश्वराची उपासना करावी. 4शब्बाथ दिवशी अधिपतीने परमेश्वरास जे अर्पण करायचे ते सहा निर्दोष कोकरे व निर्दोष मेंढा यांचे होमार्पण असे करावे. 5त्याने मेंढ्यासाठी एक एफा अन्नार्पण करावे व कोकरांसाठी जसे त्यांची देण्याची इच्छा आहे तसे त्यांनी अन्नार्पण द्यावे. आणि प्रत्येक एफाबरोबर एक हीनभर तेल अर्पावे. 6नवचंद्रदिनी त्याने एक निर्दोष गोऱ्हा, सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष मेंढा अर्पण करावा. 7त्याने बैलासाठी व मेंढ्यासाठी प्रत्येकी एक एफा अन्नार्पण सिद्ध करावे. एका कोकरांसाठी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने द्यावे. आणि प्रत्येक एफाबरोबर एक हीनभर तेल अर्पावे. 8जेव्हा अधिपती दरवाजा व देवडीच्या मार्गाने आत प्रवेश करील तेव्हा त्याने त्याच मार्गाने बाहेर जावे. 9पण देशातले लोक नेमलेल्या सणांच्या दिवसात परमेश्वरासमोर येतील. त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कोणीही आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये. तर सरळ पुढे बाहेर जावे. 10आणि ते प्रवेश करीत असता अधिपती त्यांच्यामध्ये आत जाईल ते बाहेर जात असता त्याने त्यांच्याबरोबर बाहेर जावे. 11सणांच्या आणि उत्सवाच्या दिवशी, एका गोऱ्ह्यामागे एक एफा अन्नार्पण व एक एडक्यामागे अन्नार्पण करावे. एक कोकरामागे जी काही त्याची देण्याची इच्छा असेल तसे करावे. आणि एफासाठी एक हीनभर तेल द्यावे. 12जेव्हा अधिपती परमेश्वरासाठी स्वसंतोषाचे अर्पण म्हणून होमबली व शांत्यर्पणे करील तेव्हा पूर्वेचे दार त्याच्यासाठी उघडावे. मग शब्बाथाच्या दिवसाप्रमाणे त्याने होमार्पणे व शात्यर्पणे करावी. मग त्याने बाहेर जावे आणि तो बाहेर गेल्यावर दार बंद करावे. 13“परमेश्वरास रोज होमार्पण करण्यासाठी तू एक वर्षांचे निर्दोष असे कोकरु द्यावे. तू दररोज सकाळी हे करावे. 14आणि दररोज सकाळी त्याबरोबर तुम्ही अन्नार्पण द्यावे. गव्हाचे पीठ एफाचा सहावा भाग व ते नरम करण्यासाठी हीनाचा तिसरा भाग तेल, असे अन्नार्पण परमेश्वरास करावे. हा सर्वकाळचा विधी सतत चालावयाचा आहे. 15याप्रमाणे ते रोज सकाळी निरंतरच्या होमार्पणासाठी कोकरू, अन्नार्पण व तेल रोज सकाळी सिद्ध करतील.” 16प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जर अधिपतीने आपल्या मुलापैकी एकाला काही इनाम दिले तर ते त्याच्या वतनातले असल्यामुळे त्याच्या मुलाचे होईल. ते त्याचे वतन आहे. 17पण त्याने जर आपल्या वतनाचा काही भाग, आपल्या एखाद्या सेवकाला दिला, तर स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंत तो त्या सेवकाचा होईल. मग तो अधिपतीकडे परत जाईल. त्याचे वतन त्याच्या मुलासच मिळेल. 18आणि अधिपतीने लोकांचे कोणतेही वतन घेऊन त्यास घालवून देऊ नये. त्याने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग आपल्या मुलांना द्यावा. म्हणजे माझ्या लोकांपैकी प्रत्येक मनुष्य आपआपल्या वतनातून विखरला जाऊ नये.” 19मग त्या मनुष्याने मला दाराच्या जवळून पलीकडे नेले. उत्तरेकडे तोंड असलेल्या याजकाच्या पवित्र खोल्याकडे त्याने मला नेले. आणि पाहा! तेथे अगदी पश्चिमेकडे एक जागा दिसली. 20तो मला म्हणाला, “येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवतील, ज्यात ते अन्नार्पण भाजतील ते हेच आहे यासाठी की, लोकांस पवित्र करायला त्यांनी ती अर्पणे घेऊन बाहेरच्या अंगणात जाऊ नये.” 21मग मला त्याने बाहेरच्या अंगणात आणले आणि त्याने मला अंगणाच्या चारी कोपऱ्यात नेले. आणि पाहा! अंगणाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक अंगण होते. 22अंगणाच्या चारी कोपऱ्यात चाळीस हात लांब व तीस हात रुंदीची आवारे होती. चारी कोपरे सारख्याच मापाचे होते. 23त्यामध्ये चाऱ्हींच्या भोवताली दगडाची भिंत होती. त्या भिंतीत दगडाच्या रांगाखाली स्वयंपाकासाठी जागा केलेली होती. 24तो मनुष्य मला म्हणाला, “या पाकशाला आहेत, त्यामध्ये येथे मंदिराचे सेवक लोकांकडचा यज्ञ शिजवतील.”

सध्या निवडलेले:

यहे. 46: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन