YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 शमु. 4

4
ईश-बोशेथाचा वध
1हेब्रोन येथे अबनेर मरण पावल्याचे शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याला कळले. तेव्हा तो आणि इतर सर्व इस्राएली लोक भयभीत झाले. 2शौलाच्या पुत्राजवळ दोन माणसे सेनानायक होती; रेखाब आणि बाना ही त्यांची नावे होती. हे रिम्मोनचे पुत्र. रिम्मोन हा बैरोथचा, बैरोथ नगर बन्यामीन वंशाचे, म्हणून हे ही बन्यामिनी होत. 3पण बैरोथ येथील सर्व लोक गित्तईम येथे पळून गेले. अजूनही ते तिथेच आहे. 4शौलाचा मुलगा योनाथान याला मफीबोशेथ नावाचा मुलगा होता. इज्रेलहून शौल आणि योनाथान यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा हा मफीबोशेथ पाच वर्षांचा होता. शत्रूच्या भीतीने त्याची दाई त्यास घेऊन पळाली. पळापळीत तिच्या हातून तो खाली पडला आणि दोन्ही पायांनी अधू झाला. 5बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना ही दुपारच्या वेळी ईश-बोशेथच्या घरी गेली. ऊन असल्यामुळे ईश-बोशेथ तेव्हा आराम करत होता. 6गहू घेण्याच्या आमिषाने रेखाब आणि बाना घरात घूसले त्यांनी त्याच्या पोटावर वार केला; मग ते दोघेही निसटून गेले. 7ते घूसले तेव्हा आपल्या शयनगृहात ईश-बोशेथ झोपला होता. त्याच्यावर हल्ला करून या दोघांनी त्यास ठार मारले. त्याचे शीर धडावेगळे करून ते बरोबर घेतले. मग यार्देनच्या खोऱ्यातून रात्रभर वाटचाल करत. 8ते हेब्रोन येथे पोहोचले आणि दावीदाला त्यांनी ईश-बोशेथचे मस्तक अर्पण केले. रेखाब आणि बाना दावीद राजाला म्हणाले, “शौल पुत्र ईश-बोशेथ या आपल्या शत्रूचे हे मस्तक. त्याने तुमच्या वधाचा प्रयत्न केला. त्याबद्दल आज परमेश्वरानेच शौलाला आणि त्याच्या कुटुंबियांना तुमच्यासाठी शासन केले.” 9पण दावीद बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना यांना म्हणाला, “देवाची शपथ परमेश्वरानेच मला आजपर्यंत सर्व संकटातून सोडवले आहे. 10यापूर्वीही एकदा आपण चांगली बातमी आणली आहे असे वाटून एकाने मला सांगितले, पाहा शौल मेला त्यास वाटले या बातमीबद्दल मी त्यास बक्षीस देईन पण मी त्यास धरून सिकलाग येथे ठार केले. 11तुम्हासही आता ठार करून या भूमीवरून नष्ट केले पाहिजे. कारण, आपल्या घरात, आपल्या बिछान्यावर झोपलेल्या एका चांगल्या मनुष्यास तुम्ही दुष्टाव्याने ठार केलेत.” 12असे म्हणून दावीदाने आपल्या तरुण सैनिकांना रेखाब आणि बाना यांना ठार करायची आज्ञा दिली. तेव्हा या तरुणांनी त्यांचे हात पाय तोडून त्यांना हेब्रोन येथील तळ्यापाशी टांगले. मग हेब्रोन येथे अबनेरच्या कबरीजवळच त्यांनी ईश-बोशेथच्या मस्तकाचे दफन केले.

सध्या निवडलेले:

2 शमु. 4: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन