YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 9:1-13

2 राजे 9:1-13 IRVMAR

अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्यास म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ-गिलाद येथे जा. येथे पोचल्यावर निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याला शोधून काढ. मग आत जाऊन त्यास त्याच्या भावांमधून उठवून आतल्या खोलीत ने. त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे,’ असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!” तेव्हा तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलाद येथे आला येथे पोचल्यावर त्यास सैन्यातील सरदार बसलेले आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुमच्यासाठी एक निरोप आहे.” येहू म्हणाला, “आम्ही सर्वच इथे आहोत. निरोप नक्की कोणासाठी आहे?” तेव्हा तो तरुण म्हणाला, “हे सरदारा, तुझ्याशीच; माझे काम आहे.” यावर येहू उठून घरात आला. त्या तरुण संदेष्ट्याने त्याच्या मस्तकावर तेलाचा अभिषेक केला. येहूला तो म्हणाला, इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “इस्राएलचा पुढचा राजा म्हणून मी तुला अभिषेक करत आहे.” तुमचा राजा अहाब याच्या घराण्याचा तू संहार करावास. अशा तऱ्हेने मी माझे सेवक, संदेष्टे, परमेश्वराचे सर्व सेवक यांच्या वधाचा सूड घेऊन ईजबेलला शासन करणार आहे. म्हणजे अहाबचे संपूर्ण घराणे नष्ट होईल. अहाबाच्या घराण्यात एकही मुलगा जिवंत राहणार नाही. मग ती इस्राएलमधील मुक्त व्यक्ती असो की गुलाम. नबाटचा मुलगा यराबाम तसेच अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यासारखी अहाबाच्या घराण्याची मी गत करून टाकीन. “ईजबेलला इज्रेल भागात कुत्री खातील. तिचे दफन होणार नाही. एवढे बोलून हा तरुण संदेष्टा दार उघडून पळून गेला.” येहू पुन्हा राजाच्या सरदारांमध्ये आला. तेव्हा त्यांच्यातला एकजण म्हणाला, “येहू, सर्व कुशल आहे ना? तो वेडा तुझ्याकडे कशाला आला होता?” येहू त्यांना म्हणाला, “तो मनुष्य कोण आणि त्याचा संदेश तुम्हास माहित आहेच.” तेव्हा ते सर्व म्हणाले, “नाही, नाही खर काय झाले ते सांग. काय म्हणाला तो?” तेव्हा तो तरुण संदेष्टा काय म्हणाला ते येहूने सरदारांना सांगितले. येहू म्हणाला, “तो मला म्हणाला, ‘इस्राएलाचा राजा म्हणून परमेश्वराच्या सांगण्यावरुन मी तुला अभिषेक करत आहे.” हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली.