YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहा. 4:1-10

1 योहा. 4:1-10 IRVMAR

प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत. अशाप्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखा “येशू ख्रिस्त देह धारण करून आला.” हे जो प्रत्येक आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे. आणि जो प्रत्येक आत्मा येशूला कबूल करत नाही, तो देवापासून नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे; तो येणार हे तुम्ही ऐकले आहे. तो जगात आताही आहे. माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षां जो तुमच्यामध्ये आहे; तो महान देव आहे. ते आत्मे जगाचे आहेत म्हणून ते जगाच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते. पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा कोणता आणि फसवणारा आत्मा कोणता हे आपण ओळखतो. प्रियांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती देवाकडून आहे आणि जो कोणी प्रीती करतो तो प्रत्येकजण देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हास जीवन मिळावे. अशाप्रकारे त्याने त्याची आम्हावरील प्रीती दाखवली आहे. आम्ही देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापांकरिता प्रायश्चित्त म्हणून पाठवले; यातच खरी प्रीती आहे.