1 इति. 9
9
बाबेलहून परत आलेले लोक
1इस्राएलाच्या सर्व लोकांची नोंद वंशावळीप्रमाणे केलेली आहे. इस्राएलाच्या राजाच्या पुस्तकात ती लिहिलेली आहे. त्यांच्या पापामुळे यहूदाच्या लोकांस बाबेल येथे कैद करून नेण्यात आले. 2त्यापैकी जे सगळ्यात आधी आपल्या, नगरात येऊन राहिले ते म्हणजे इस्राएल लोक याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग. 3यरूशलेमामध्ये राहणाऱ्या यहूदा, बन्यामीन, एफ्राईम आणि मनश्शे घराण्यातील लोक राहत होते.
4ऊथय हा अम्मीहूदचा पुत्र. अम्मीहूद हा अम्रीचा पुत्र. अम्री इम्रीचा पुत्र. इम्री बानीचा पुत्र. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा पुत्र. 5यरूशलेमामध्ये राहणारे शिलोनी लोक असे, ज्येष्ठ पुत्र असाया आणि त्याचे पुत्र. 6यरूशलेममधील जेरह चे वंशज म्हणजे यऊवेल आणि त्याचे एकंदर सहाशे नव्वद भाऊबंद.
7बन्यामीन घराण्यातील लोक: सल्लू हा मशुल्लामचा पुत्र. मशुल्लाम होदव्याचा पुत्र. होदवा हस्सनुवाचा पुत्र. 8इबनया हा यरोहामाचा पुत्र. एला उज्जीचा पुत्र. उज्जी मिख्रीचा पुत्र. मशुल्लाम शफाट्याचा पुत्र. शफाट्या रगुवेलचा पुत्र रगुवेल इबनीया याचा पुत्र. 9त्याचे नातेवाइक वंशावळीच्या यादीत लिहिले ते एकंदर नऊशें छपन्न होते. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते.
10यरूशलेममधील याजक यदया, यहोयारीब, याखीन, अजऱ्या. 11अजऱ्या हा हिल्कीयाचा पुत्र. हिल्कीया मशुल्लामचा पुत्र. मशुल्लाम सादोकाचा. सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहीटूबचा पुत्र. अहीटूब हा देवाच्या मंदिरावरील प्रमुख अधिकारी होता.
12यरोहामाचा पुत्र अदाया होता. यहोराम हा पशहूरचा पुत्र. पशहूर मल्कीयाचा, आणि अदीएलचा पुत्र मसय. अदीएल यहजेराचा पुत्र, यहजेरा मशुल्लामचा पुत्र, मशुल्लेम मशिल्लेमीथचा, मशिल्लेमीथ इम्मेराचा पुत्र. 13असे एकंदर एक हजार सातशे साठ याजक होते. ते आपापल्या घराण्यांचे मुख्य होते. देवाच्या मंदिरातील सेवेच्या कामात फार प्रवीण होते. 14यरूशलेममधील लेवी घराण्यातले लोक हश्शूबचा पुत्र शमाया. हश्शूब अज्रीकामचा पुत्र. अज्रीकाम हशब्याचा पुत्र. हशब्या हा मरारीच्या वंशातला. 15याखेरीज बकूबकर, हेरेश, गालाल आणि मतन्या हे ही यरूशलेमामध्ये राहत होते. मत्तन्या मीखाचा पुत्र. मीखा जिख्रीचा पुत्र. जिख्री आसाफचा पुत्र. 16ओबद्या शमाया याचा पुत्र. शमाया गालालचा पुत्र. गालाल यदूथूनचा पुत्र. याखेरीज आसा याचा पुत्र बरेख्या हाही तेथे राहत होता. आसा एलकानाचा पुत्र. हा नटोफाथी लोकांच्या जवळच्या छोट्या गावांमध्ये राहत होता.
17यरूशलेममधील द्वाररक्षक शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान आणि त्यांचे नातलग. शल्लूम हा त्यांच्यावरचा मुख्य. 18हे लोक आता राजाच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वारापाशी उभे असतात. हे लेवीच्या वंशातले होते. 19शल्लूम हा कोरे याचा पुत्र. कोरे हा एब्यासाफचा पुत्र. एब्यासाफ कोरहचा पुत्र. शल्लूम आणि त्याचे भाऊबंद हे द्वारपाल होते. ते कोरहाच्या वंशातले होते. निवासमंडपाच्या द्वाररक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते परमेश्वराच्या छावणीवर कामदार असून व्दारपालाचे काम पार पाडत होते.
20पूर्वी फिनहास द्वारपालाचा प्रमुख होता. फिनहास हा एलाजाराचा पुत्र. परमेश्वर त्याच्या बरोबर होता. 21मशेलेम्या याचा पुत्र जखऱ्या “दर्शनमंडपाचा” द्वारपाल होता.
22निवासमंडपाचे रक्षण करणारे असे एकंदर दोनशे बारा निवडक द्वाररक्षक होते. आपापल्या गावांच्या वंशावळ्यांमध्ये त्यांची नावे लिहिलेली आहेत. त्यांचा विश्वासूपणा पाहून दावीद आणि शमुवेल संदेष्टा यांनी त्यांची नेमणूक केली होती 23परमेश्वराच्या मंदिराच्या, निवासमंडपाच्या प्रवेशद्वारांवर राखण करण्याची जबाबदारी या द्वारपालांची आणि त्यांच्या वंशजांची होती. 24पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चार दिशांना प्रवेशद्वारे होती.
25आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत. 26या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते. 27देवाच्या मंदिरावर पहारा करण्यासाठी ते रात्रभर त्यासभोवती जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते.
28त्यांच्यातले काहीजण मंदिरात उपयोगात येणाऱ्या पात्रांची देखभाल करत. ती पात्रे बाहेर काढताना आणि पुन्हा आत ठेवताना ते ती मोजून ठेवत असत. 29आणि त्यांच्यांतले काहीजण सामानावर व पवित्रस्थानाच्या सर्व पीठ, द्राक्षरस, तेल, धूप, सुवासिक द्रव्य आणि साधनांची काळजी घेण्यास यावर नेमलेले होते.
30याजकांचे काही पुत्र सुवासिक द्रव्याचे मिश्रण करण्याचे काम करत असत. 31लेव्यातला एक मत्तिथ्या, जो शल्लूम कोरही याचा थोरला पुत्र होता. अर्पणाच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचा प्रमुख होता. 32कहाथीच्या वंशातील त्यांचे काही भाऊ, प्रत्येक शब्बाथवारी समक्षतेच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचे प्रमुख होते. 33लेव्यांच्या घराण्यांचे प्रमुख गायक होते ते मंदिरातील खोल्यांत राहत होते. कारण जेव्हा ते कामातून मोकळे होत असत, त्यांना रात्रंदिवस आपले नेमून दिलेले काम करावे लागत असे. 34हे लेव्यांच्या घराण्यांतील प्रमुख होते, जशी त्यांची वंशावळ्यांमध्ये नोंद केली होती. ते यरूशलेमात राहत होते.
शौलाची वंशावळ
35गिबोनाचा पिता ईयेल गिबोनात राहत होते. त्याच्या पत्नीचे नाव माका होते. 36ईयेल्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव अब्दोन. सूर, कीश, बाल, नेर आणि नादाब त्याची आणखी पुत्र, 37गदोर, अह्यो, जखऱ्या आणि मिकलोथ ही त्याचीच अपत्ये.
38मिकलोथ शिमामाचा पिता होता. तेसुध्दा यरूशलेमेमध्ये आपल्या भाऊबंदाजवळच राहत होते.
39नेर हा कीशाचा पिता होता.
कीश शौलाचा पिता होता.
शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब आणि एश्बालाचा पिता होता.
40मरीब्बाल हा योनाथानाचा पुत्र.
मीखा हा मरीब्बालाचा पुत्र.
41पीथोन, मेलेख आणि तरहेया हे मीखाचे पुत्र.
42आहाज याराचा पिता होता.
यारा आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्री यांचा पिता होता.
जिम्रीन मोसाचा पिता होता.
43मोसा बिनाचा पिता होता.
बिना रफायाचा पिता होता.
रफाया एलासाचा पिता होता.
एलासा आसेलाचा पिता होता.
44आसेलाला सहा पुत्र झाले. त्यांची नावे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या आणि हानान. ही आसेलाची अपत्ये होती.
सध्या निवडलेले:
1 इति. 9: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.