जखर्या 3
3
मुख्य याजक यहोशवा ह्याचा दृष्टान्त
1तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे, असे त्याने मला दाखवले.
2मग परमेश्वर सैतानास म्हणाला, “अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो; यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो; हा अग्नीतून काढलेले कोलीत नव्हे काय?”
3यहोशवा मलीन वस्त्रे परिधान करून त्या दिव्यदूतापुढे उभा होता.
4त्याच्यासमोर जे उभे होते त्यांना तो उत्तरादाखल म्हणाला, “त्याच्यावरची मलीन वस्त्रे काढा.” तो त्याला म्हणाला, “पाहा, मी तुझा अधर्म तुझ्यापासून दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घालत आहे.”
5मी म्हणालो, “त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदील घालावा.” तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदील व पोशाख घातला; आणि परमेश्वराचा दिव्यदूत जवळ उभा होता.
6परमेश्वराच्या दिव्यदूताने यहोशवास प्रतिज्ञापूर्वक सांगितले की,
7“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपवलेले सर्व सांभाळले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील व माझ्या अंगणाचे रक्षण करशील व तेथे उभे असणार्यांत तुझे जाणेयेणे होईल असे मी करीन.
8आता हे मुख्य याजका, यहोशवा, तू व तुझ्याबरोबर बसणारे तुझे सोबती, तुम्ही ऐका; ती माणसे चिन्हादाखल आहेत; पाहा, मी माझा सेवक जो ‘कोंब’ त्याला आणतो.
9मी यहोशवापुढे ठेवलेला चिरा पाहा; एका चिर्याला सात डोळे आहेत, पाहा, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी त्यावर नक्षी खोदीन व त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करीन.
10सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी तुम्ही प्रत्येक आपल्या शेजार्यास द्राक्षीच्या वेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली येण्याचे आमंत्रण कराल.”
सध्या निवडलेले:
जखर्या 3: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.