दारयावेशाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी आठव्या महिन्यात इद्दोचा पुत्र बरेख्या ह्याचा पुत्र जखर्या संदेष्टा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे : “परमेश्वर तुमच्या वाडवडिलांवर फार कोपायमान झाला, म्हणून तू त्यांना असे सांग : ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे वळा म्हणजे मी तुमच्याकडे वळेन,’ असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका; त्यांना पूर्वीच्या संदेष्ट्यांनी पुकारून सांगितले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपल्या कुमार्गांपासून व आपल्या दुष्कर्मांपासून परावृत्त व्हा; पण त्यांनी माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही, असे परमेश्वर म्हणतो. तुमचे पूर्वज आता कोठे आहेत? संदेष्टे तरी सर्वकाळ जगतात काय? असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे ह्यांना जी वचने व नियम मी आज्ञापले होते त्यांनी तुमच्या पूर्वजांना गाठले नाही काय? तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे ह्यांप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे.”
जखर्या 1 वाचा
ऐका जखर्या 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: जखर्या 1:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ