तीत 2
2
ख्रिस्तशिष्याला साजेशी वागणूक
1तू तर सुशिक्षणाला जे शोभते ते बोल.
2वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यांमध्ये दृढ राहावे.
3तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे; त्या चहाडखोर, मद्यपानासक्त नसाव्यात; सुशिक्षण देणार्या असाव्यात;
4त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या नवर्यांवर व मुलाबाळांवर प्रेम करावे;
5त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणार्या, मायाळू, आपापल्या नवर्याच्या अधीन राहणार्या, असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.
6तसेच तरुण पुरुषांनी मर्यादशील असावे म्हणून त्यांना बोध कर.
7सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे स्वतःला दाखव; शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण ह्यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे;
8ह्यासाठी की, विरोध करणार्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी.
9दासांनी आपल्या धन्यांच्या अधीन राहावे; त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे, उलट बोलू नये,
10त्यांना लुबाडू नये तर सर्व प्रकारे इमानेइतबारे वागावे, ह्यासाठी की, त्यांनी सर्व गोष्टींत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणावी, असा बोध कर.
ख्रिस्तशिष्याला साजेसे हेतू
11कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे; ती आपल्याला असे शिकवते की,
12,13धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे.
14त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, ह्यासाठी की, ‘त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे,’ आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.’
15ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये असे वाग.
सध्या निवडलेले:
तीत 2: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.