अगे माझ्या वधू! लबानोनावरून माझ्याबरोबर, लबानोनावरून माझ्याबरोबर ये; अमानाच्या माथ्यावरून, सनीर व हर्मोन ह्यांच्या माथ्यांवरून, सिंहांच्या गुहांतून, चित्त्यांच्या पहाडांवरून तू नजर फेक. अगे माझे भगिनी, माझे वधू, तू माझे मन मोहित केले; तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या लहानशा हाराने माझे मन मोहिले. अगे माझे भगिनी, माझे वधू! तुझे प्रेम किती मनोरम आहे! तुझे प्रेम द्राक्षारसाहून कितीतरी मधुर आहे! तुझ्या उटण्यांचा वास सर्व प्रकारच्या सुगंधी द्रव्यांहून मधुर आहे! माझे वधू! तुझ्या ओठांतून मधु स्रवतो; तुझ्या जिव्हेखाली मधु व दुग्ध आहेत; तुझ्या वस्त्रांचा सुवास लबानोनाच्या सुगंधासारखा आहे. माझी भगिनी, माझी वधू, ही बंद असलेली बाग, बंद असलेला निर्झर, मोहरबंद कारंजे होय. तुझ्या ठायी सुंदर फळे देणारी डाळिंबाची वाटिका अंकुरित झाली आहे. मेंदी व जटामांसी, जटामांसी व केशर, वेखंड व दालचिनी, उदाची सर्व प्रकारची झाडे, आणि गंधरस व अगरू, तशीच इतर सर्व सुगंधी झाडे तुझ्या ठायी आहेत.
गीतरत्न 4 वाचा
ऐका गीतरत्न 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गीतरत्न 4:8-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ