YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गीतरत्न 4:8-14

गीतरत्न 4:8-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये. लबानोनातून माझ्याबरोबर ये; अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सिंहाच्या गुहेतून, चित्त्याच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये. अगे माझ्या बहिणी, माझ्या वधू, तू माझे हृदय हरण केले आहेस. तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने तू माझे हृदय चोरले आहेस. माझ्या प्रिये, माझ्या वधू, तुझे प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे. माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना लबानोनाच्या वासासारखा गोड सुवास आहे. माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू तर बंद केलेल्या बागेसारखी आहेस. तू बंद असलेल्या झऱ्यासारखी, शिक्का मारलेल्या कारंज्यासारखी आहेस. तुझी रोपे मोलवान फुले असलेला डाळिंबाचा मळा अशी आहेत. त्यामध्ये कापराची व जटामांसीची झाडे, मेंदी, जटामांसी, केशर, वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत. तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरू व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत.

सामायिक करा
गीतरत्न 4 वाचा

गीतरत्न 4:8-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

माझ्या वधू, लबानोनाहून तू माझ्यासोबत ये, लबानोनाहून माझ्यासोबत ये, अमानाह डोंगराच्या माथ्यावरून, सनीर व हर्मोनच्या शिखरावरून, सिंहाच्या गुहांपासून आणि चित्ते वावरतात त्या डोंगरावरून खाली उतरून ये. अगे माझ्या भगिनी, माझी वधू; तुझ्या एकाच नजरेने तुझ्या माळेच्या एकाच मणीने तू माझे हृदय चोरून घेतले आहेस. माझ्या भगिनी, माझ्या वधू, तुझे प्रेम किती हर्षित करणारे आहे! तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा कितीतरी उत्तम आहे, इतर सुगंधी द्रव्यांपेक्षा तुझ्या अत्तराचा सुगंध अधिक मनमोहक आहे. माझ्या वधू, तुझे ओठ मधाच्या पोळ्याप्रमाणे मध गाळतात; दूध आणि मध तुझ्या जिभेखाली आहेत. तुझ्या वस्त्रांचा सुगंध लबानोनाच्या सुगंधासारखा आहे. माझ्या भगिनी, माझ्या वधू तू एका बंद केलेली बाग आहेस; तू एक कुंपणाने घेरलेल्या झर्‍यासारखी, शिक्कामोर्तब कारंज्याप्रमाणे आहेस. तुझी रोपे तर डाळिंबाचा मळा आहे, ज्यात सर्वोत्कृष्ट फळे, मेंदी आणि सुगंधी अगरू आहेत, अगरू आणि केशर, वेखंड आणि दालचिनी, सर्व प्रकारची सुगंधी झाडे, तसेच गंधरस आणि जटामांसी आणि सर्व उत्तम मसाले आहेत.

सामायिक करा
गीतरत्न 4 वाचा

गीतरत्न 4:8-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अगे माझ्या वधू! लबानोनावरून माझ्याबरोबर, लबानोनावरून माझ्याबरोबर ये; अमानाच्या माथ्यावरून, सनीर व हर्मोन ह्यांच्या माथ्यांवरून, सिंहांच्या गुहांतून, चित्त्यांच्या पहाडांवरून तू नजर फेक. अगे माझे भगिनी, माझे वधू, तू माझे मन मोहित केले; तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या लहानशा हाराने माझे मन मोहिले. अगे माझे भगिनी, माझे वधू! तुझे प्रेम किती मनोरम आहे! तुझे प्रेम द्राक्षारसाहून कितीतरी मधुर आहे! तुझ्या उटण्यांचा वास सर्व प्रकारच्या सुगंधी द्रव्यांहून मधुर आहे! माझे वधू! तुझ्या ओठांतून मधु स्रवतो; तुझ्या जिव्हेखाली मधु व दुग्ध आहेत; तुझ्या वस्त्रांचा सुवास लबानोनाच्या सुगंधासारखा आहे. माझी भगिनी, माझी वधू, ही बंद असलेली बाग, बंद असलेला निर्झर, मोहरबंद कारंजे होय. तुझ्या ठायी सुंदर फळे देणारी डाळिंबाची वाटिका अंकुरित झाली आहे. मेंदी व जटामांसी, जटामांसी व केशर, वेखंड व दालचिनी, उदाची सर्व प्रकारची झाडे, आणि गंधरस व अगरू, तशीच इतर सर्व सुगंधी झाडे तुझ्या ठायी आहेत.

सामायिक करा
गीतरत्न 4 वाचा