YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गीतरत्न 3:6-10

गीतरत्न 3:6-10 MARVBSI

गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये ह्यांच्या सुगंधाने युक्त असे धुरांच्या स्तंभांसारखे रानातून हे येत आहे ते काय? पाहा, तो शलमोनाचा मेणा येत आहे; त्याच्याबरोबर साठ वीर पुरुष चालत आहेत; ते इस्राएलाच्या वीर पुरुषांपैकी आहेत. ते सर्व खड्गधारी व युद्धप्रवीण आहेत; रात्रीच्या समयी प्राप्त होणार्‍या भयास्तव प्रत्येकाच्या कमरेला तलवार लटकत आहे. शलमोन राजाने आपणासाठी लबानोनी लाकडाचा एक मेणा करवला आहे. त्याचे दांडे रुप्याचे आहेत; त्याची पाठ सोन्याची आहे; त्याची गादी जांभळ्या रंगाची आहे; त्याचा अंतर्भाग यरुशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने विभूषित केला आहे.