गीतरत्न 3:6-10
गीतरत्न 3:6-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
(ती तरुणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील सर्व चूर्णानी सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने अशी धुराच्या खांबासारखी, रानातून येणारी ती ही कोण आहे? पाहा, ती शलमोनाची पालखी येत आहे. त्याच्यासभोवती साठ सैनिक आहेत, ते साठजण इस्राएलाच्या सैनिकांपैकी आहेत. ते सगळे निपुण लढवय्ये व तलवारधारी आहेत. रात्री येणाऱ्या कोणत्याही संकटाचा मुकाबला करायला ते तयार आहेत. राजा शलमोनाने स्वत:साठी लबानोनी लाकडाची पालखी तयार केली. त्याचे खांब चांदीचे केले. पाठ सोन्याची केली. बैठक जांभळ्या रंगाच्या कापडाने मढवली. त्याचा अंतर्भाग यरूशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने सजवला आहे.
गीतरत्न 3:6-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हा धुराच्या स्तंभासारखे व्यापाऱ्यांच्या सर्व सुगंधित पदार्थांनी, ऊद आणि गंधरस यांनी सुगंधित, असा रानातून हा कोण येत आहे? पाहा! ही तर शलोमोनाची पालखी आहे! इस्राएलातील निवडलेल्या साठ योद्ध्याच्या दलाच्या पहाऱ्यात आलेली आहे. ते सर्व धनुर्धारी, आणि युद्धात अनुभवी आहेत. रात्री होणार्या आतंकासाठी सज्ज असलेले, प्रत्येकाने आपली तलवार सोबत घेतली आहे. शलोमोन राजाने लबानोनाच्या लाकडाची ही पालखी; स्वतःसाठी बनविली आहे. त्याचे खांब चांदीचे आहेत, त्याचे तळ सोन्याचे आहे. त्यातील बैठक जांभळ्या वस्त्रांची आहे, तिच्या आतील भागाला यरुशलेमच्या कन्यांनी प्रेमाने वेलबुट्टीने मढविले आहे. यरुशलेमच्या तरुणीकडून प्रेमपूर्वक भेट.
गीतरत्न 3:6-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये ह्यांच्या सुगंधाने युक्त असे धुरांच्या स्तंभांसारखे रानातून हे येत आहे ते काय? पाहा, तो शलमोनाचा मेणा येत आहे; त्याच्याबरोबर साठ वीर पुरुष चालत आहेत; ते इस्राएलाच्या वीर पुरुषांपैकी आहेत. ते सर्व खड्गधारी व युद्धप्रवीण आहेत; रात्रीच्या समयी प्राप्त होणार्या भयास्तव प्रत्येकाच्या कमरेला तलवार लटकत आहे. शलमोन राजाने आपणासाठी लबानोनी लाकडाचा एक मेणा करवला आहे. त्याचे दांडे रुप्याचे आहेत; त्याची पाठ सोन्याची आहे; त्याची गादी जांभळ्या रंगाची आहे; त्याचा अंतर्भाग यरुशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने विभूषित केला आहे.