YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 9:9-21

रोमकरांस पत्र 9:9-21 MARVBSI

कारण, “पुढे ह्याच सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल,” ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते. इतकेच नव्हे, तर रिबकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून गरोदर राहिल्यावर, मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरेवाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मांमुळे नव्हे, तर पाचारण करणार्‍याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा, म्हणून तिला सांगण्यात आले की, “वडील धाकट्याची सेवा करील.” त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की, “मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला.” तर आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय आहे काय? कधीच नाही! कारण तो मोशेला म्हणतो, “ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करीन.” ह्यावरून हे इच्छा बाळगणार्‍यावर नव्हे किंवा धावपळ करणार्‍यावर नव्हे, तर दया करणार्‍या देवावर अवलंबून आहे. शास्त्रलेख फारोला असे सांगतो, “मी तुला पुढे केले आहे ते ह्याचकरता की, तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे.” ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल त्याला तो ‘कठीण हृदयाचे करतो.’ ह्यावर तू मला म्हणशील, तर मग तो अजून दोष का लावत असतो? कारण त्याच्या संकल्पाला कोण आड आला आहे? हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडवणार्‍याला, “तू मला असे का केलेस,” असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय?