YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 12:13-18

रोमकरांस पत्र 12:13-18 MARVBSI

पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा. तुमचा छळ करणार्‍यांना आशीर्वाद द्या; आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्‍यांबरोबर शोक करा. परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वत:ला शहाणे समजू नका. वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा.