YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 22:3-10

प्रकटी 22:3-10 MARVBSI

‘पुढे काहीही शापित असणार नाही;’ तर तिच्यामध्ये देवाचे व कोकर्‍याचे राजासन असेल; आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ‘ते त्याचे मुख पाहतील’ व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा ‘सूर्याच्या प्रकाशाची’ गरज नाही; कारण प्रभू देव त्यांच्यावर ‘प्रकाश पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील.’ नंतर तो मला म्हणाला, “ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत; आणि संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा2 देव जो प्रभू त्याने ज्या गोष्टी लवकर ‘घडून आल्या पाहिजेत’ त्या गोष्टी आपल्या दासांना कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवले आहे. ‘पाहा, मी लवकर येतो.’ ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य. हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणार्‍या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो; परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस; मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा दास आहे; नमन देवाला कर.” पुन्हा तो मला म्हणाला, “ह्या ‘पुस्तकातील’ संदेशवचने ‘शिक्का मारून बंद करू नकोस;’ कारण ‘वेळ’ जवळ आली आहे.