YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 95:1-7

स्तोत्रसंहिता 95:1-7 MARVBSI

याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू. उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे; सर्व देवांहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत; पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला; कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडवली गेली. याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल!