याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू. उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे; सर्व देवांहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत; पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला; कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडवली गेली. याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल! मरीबा येथल्याप्रमाणे, रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका; तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती तरी त्यांनी माझी परीक्षा केली व मला पारखले; चाळीस वर्षे त्या पिढीचा मला वीट आला; मी म्हणालो, “हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत; ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत;” म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 95 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 95
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 95:1-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ