हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत! माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहेत. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करण्यास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधण्यास स्थळ मिळाले आहे. तुझ्या घरात राहणार्यांची केवढी धन्यता! ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. (सेला)
स्तोत्रसंहिता 84 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 84
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 84:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ