हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत! माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहेत. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करण्यास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधण्यास स्थळ मिळाले आहे. तुझ्या घरात राहणार्यांची केवढी धन्यता! ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. (सेला) ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सीयोनेच्या राजमार्गांचा ध्यास लागला आहे तो केवढा धन्य! शोकजनक1 खोर्यातून जाताना ते त्यांना झर्यांचे स्थानच वाटते; आगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करतो. ते अधिकाधिक शक्ती पावत जातात, सीयोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक; हे याकोबाच्या देवा, कान दे. (सेला) हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे2 मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य!
स्तोत्रसंहिता 84 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 84
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 84:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ