तरी त्याने वरती आभाळांस आज्ञा केली, व आकाशद्वारे उघडली. खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्न्याचा वर्षाव केला; आणि त्यांना स्वर्गातले धान्य दिले. दिव्यदूतांची भाकर मानवांनी खाल्ली; पुरून उरेल इतके अन्न त्याने त्यांना दिले. त्याने पूर्वेचा वारा आकाशात वाहवला, आणि आपल्या सामर्थ्याने दक्षिणेचा वारा आणला. त्याने त्यांच्यावर धुळीसारखा मांसाचा आणि समुद्राच्या वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला; त्याने त्यांच्या छावणीमध्ये, त्यांच्या वस्तीभोवती ते पाडले. ते खाऊन ते अगदी तृप्त झाले; अशा रीतीने त्यांची इच्छा त्याने पुरवली.
स्तोत्रसंहिता 78 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 78
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 78:23-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ