YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 72:1-7

स्तोत्रसंहिता 72:1-7 MARVBSI

हे देवा, राजाला आपले न्यायानुशासन आणि राजपुत्राला आपले नीतिमत्त्व दे. तो नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करो, तुझ्या दीनांचा निवाडा न्यायबुद्धीने करो. पर्वत व डोंगर नीतीच्या द्वारे लोकांना शांतिदायक होवोत. तो प्रजेतल्या दीनांचा न्याय करो. तो दरिद्र्यांच्या मुलाबाळांचे तारण करो, तो जुलूम करणार्‍यांना चिरडून टाको. सूर्य व चंद्र आहेत तोपर्यंत ते पिढ्यानपिढ्या तुझे भय धरोत. कापलेल्या गवतावर पडणार्‍या पर्जन्याप्रमाणे, भूमी सिंचन करणार्‍या सरींप्रमाणे तो उतरो. त्याच्या कारकिर्दित नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असो.