YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 72:1-7

स्तोत्रसंहिता 72:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे देवा, राजाला आपले न्यायानुशासन आणि राजपुत्राला आपले नीतिमत्त्व दे. तो नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करो, तुझ्या दीनांचा निवाडा न्यायबुद्धीने करो. पर्वत व डोंगर नीतीच्या द्वारे लोकांना शांतिदायक होवोत. तो प्रजेतल्या दीनांचा न्याय करो. तो दरिद्र्यांच्या मुलाबाळांचे तारण करो, तो जुलूम करणार्‍यांना चिरडून टाको. सूर्य व चंद्र आहेत तोपर्यंत ते पिढ्यानपिढ्या तुझे भय धरोत. कापलेल्या गवतावर पडणार्‍या पर्जन्याप्रमाणे, भूमी सिंचन करणार्‍या सरींप्रमाणे तो उतरो. त्याच्या कारकिर्दित नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असो.

स्तोत्रसंहिता 72:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे देवा, तू राजाला आपले न्यायाचे निर्णय, राजाच्या मुलाला आपले न्यायीपण दे. तुझ्या लोकांचा नीतीने न्याय करो, आणि तुझ्या गरीब लोकांचा न्यायनिवाडा न्यायाने करो. पर्वत लोकांसाठी शांती उत्पन्न करतील; टेकड्या न्यायीपणा उत्पन्न करतील. तो लोकांतील गरीबांचा न्याय करील; गरजवंताच्या मुलांना तारील, आणि जुलूम करणाऱ्यांचे तुकडे करील. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत सर्व पिढ्यानपिढ्या ते तुझा आदर करतील. जसा कापलेल्या गवतावर पाऊस पडतो, तशी पृथ्वीला भिजवणारी पावसाची सर उतरून येईल. त्याच्या दिवसात नितिमानाची भरभराट होवो, आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती होईल.