चिखलातून मला काढ, मला रुतू देऊ नकोस; मला माझ्या द्वेष्ट्यांपासून मुक्त कर व खोल पाण्यातून मला काढ. पाण्याचा लोंढा माझ्यावरून जाऊ देऊ नकोस; दलदलीत मला खचू देऊ नकोस; गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नकोस. हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे; आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ. आपल्या दासापासून तू आपले मुख लपवू नकोस; कारण मी संकटात आहे; माझे सत्वर ऐक; माझ्या जिवाजवळ येऊन त्याचा उद्धार कर; माझे वैरी पाहून माझा उद्धार कर.
स्तोत्रसंहिता 69 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 69
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 69:14-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ