YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 69:14-18

स्तोत्रसंहिता 69:14-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मला या दलदलीतून बाहेर काढा; मला त्यामध्ये बुडू देऊ नका; माझा द्वेष करणार्‍यापासून मला वाचवा. खोल पाण्यातून मला बाहेर काढा. महापुरांच्या लोंढ्यात मला बुडू देऊ नका किंवा डोहाला मला गिळू देऊ नका; गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नका. याहवेह, तुमच्या प्रीतिपूर्ण दयेने माझ्या प्रार्थनेची उत्तरे द्या; तुम्ही विपुल कृपेने आपले मुख माझ्याकडे करा. तुम्ही आपल्या सेवकापासून आपले मुख लपवू नका; त्वरेने मला उत्तर द्या, कारण मी संकटात सापडलो आहे. माझ्याजवळ या आणि माझा बचाव करा; माझ्या शत्रूपासून मला सोडवा.