YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 61

61
देवाच्या संरक्षणावर भरवसा
मुख्य गवयासाठी; तंतुवाद्याच्या साथीने गायचे दाविदाचे स्तोत्र.
1हे देवा, माझा धावा ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
2माझे मन व्याकूळ झाले असता दिगंतापासूनही मी तुझा धावा करतो; जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने.
3कारण तू माझा आश्रय, वैर्‍यापासून लपण्यास बळकट दुर्ग असा होत आला आहेस.
4तुझ्या मंडपात मी सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय घेईन.
(सेला)
5कारण, हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; तुझ्या नावाचे भय धरणार्‍यांचे वतन तू मला दिले आहेस;
6तू राजाला दीर्घायू कर; त्याच्या आयुष्याची वर्षें कैक पिढ्यांच्या वर्षांइतकी होवोत.
7तो देवासमोर चिरकाल राहो; तुझे वात्सल्य व सत्य त्याचे रक्षण करतील असे कर;
8म्हणजे तुझ्या नावाची स्तोत्रे निरंतर गाऊन मी आपले नवस नित्य फेडत राहीन.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 61: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन