स्तोत्रसंहिता 57
57
छळणार्यांच्या हातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना
(स्तोत्र. 105:1-5)
मुख्य गवयासाठी; अल्तश्केथ (नष्ट करू नको) ह्या चालीवर गायचे; दावीद शौलापासून पळून गुहेत गेला तेव्हा त्याने रचलेले मिक्ताम नावाचे स्तोत्र.
1हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर; माझा जीव तुझा आश्रय करतो; ही अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय करीन.
2परात्पर देवाचा, माझे सर्वकाही सिद्धीस नेणार्या देवाचा मी धावा करीन.
3तो स्वर्गातून साहाय्य पाठवून मला तारील; कारण माझा पिच्छा पुरवणारा माझा उपहास करीत आहे;
(सेला)
देव आपली दया व सत्य पाठवून देईल.
4माझा जीव सिंहांमध्ये पडला आहे; ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवारच आहे, अशा जाज्वल्य मनुष्यांमध्येदेखील मी पडून राहीन.
5हे देवा, आकाशांहून तू उन्नत हो; तुझा गौरव सर्व पृथ्वीवर होवो.
6माझ्या पायांसाठी त्यांनी जाळे मांडले आहे; माझा जीव गळून गेला आहे; माझ्या वाटेत त्यांनी खाच खणली, तिच्यात ते स्वतःच पडले आहेत.
(सेला)
7हे देवा, माझे अंतःकरण स्थिर आहे माझे अंतःकरण स्थिर आहे; मी गाईन, मी स्तोत्रे गाईन.
8हे माझ्या जिवा, जागृत हो, हे सतारी, हे वीणे, जागृत व्हा; मी प्रभातेला जागे करीन.
9हे प्रभू, लोकांमध्ये मी तुझे उपकारस्मरण करीन, राष्ट्रांमध्ये तुझी स्तोत्रे गाईन;
10कारण तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे व तुझे सत्य गगनापर्यंत आहे.
11हे देवा, आकाशाहून तू उन्नत हो; तुझा गौरव सर्व पृथ्वीभर होवो.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 57: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.