YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 56

56
श्रद्धायुक्त प्रार्थना
मुख्य गवयासाठी; योना एलेम रहोकीम (दूर असलेल्या लोकांतील स्तब्ध असा पारवा)2 ह्या चालीवर गायचे; पलिष्ट्यांनी दाविदाला गथ येथे धरले तेव्हा त्याने रचलेले मिक्ताम नावाचे स्तोत्र.
1हे देवा, माझ्यावर दया कर, कारण माणसे मला तुडवत आहेत; दिवसभर माझ्याशी लढून त्यांनी माझा छळ मांडला आहे.
2दिवसभर माझे शत्रू मला तुडवत आहेत माझ्याशी मगरुरीने लढणारे बहुत आहेत;
3मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन.
4देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन; देवावर मी भरवसा ठेवला आहे, मी भिणार नाही; मानव माझे काय करणार?
5दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपर्यास करतात; त्यांचे सर्व विचार माझ्याविरुद्ध माझ्या वाइटासाठी असतात.
6ते एकत्र जमतात, ते टपून बसतात; ते माझ्या पावलांवर पाळत ठेवतात; ते माझा जीव घेण्यास पाहतात.
7इतकी त्यांची दुष्टाई असून ते सुटतील काय? हे देवा, राष्ट्रांना क्रोधाने खाली पाड.
8माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहेत; माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेत; तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय?
9मी तुझा धावा करीन त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील. देव माझ्या पक्षाचा आहे हे मी जाणतो.
10देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन, परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची प्रशंसा करीन.
11देवावर मी भरवसा ठेवला आहे. मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?
12हे देवा, तुझ्या नवसांचे ऋण माझ्यावर आहे; मी तुला आभाररूपी अर्पणे वाहीन.
13कारण तू माझा जीव मरणापासून सोडवला आहेस; जीवनाच्या प्रकाशात देवासमोर मी चालावे म्हणून पतनापासून तू माझे पाय राखले नाहीत काय?

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 56: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन