कारण ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; माझ्यापुढे ज्याने तोरा मिरवला तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो; पण तो तूच माझ्या बरोबरीचा माणूस, माझा सोबती व माझा सलगीचा मित्र होतास. आम्ही एकमेकांशी गोडगोड गोष्टी बोलत असू, देवाच्या घरी मेळ्याबरोबर जात असू. त्यांना अकस्मात मरण येवो; ते जिवंतच अधोलोकी उतरोत; त्यांच्या घरात व अंतर्यामात दुष्टाई आहे. मी तर देवाचा धावा करीन, आणि परमेश्वर मला तारील. संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकळुतीने आपले गार्हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. माझ्यावर हल्ला करणार्यांपासून त्याने माझा जीव सोडवला आणि सुरक्षित ठेवला आहे; माझ्याशी कलह करणारे तर पुष्कळ होते. देव ऐकेल व त्यांचे पारिपत्य करील; तोच अनादि कालापासून राजासनारूढ आहे. (सेला) कारण त्यांची वृत्ती पालटत नाही आणि ते देवाला भीत नाहीत. त्याच्याशी जे मित्रत्वाने राहत होते त्यांच्यावर त्याने आपला हात उगारला; त्याने आपला करार मोडला;1 त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते; त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नागव्या तलवारींसारखे होते. तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील. खुनी व कपटी माणसे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत; मी तर तुझ्यावर भाव ठेवीन.
स्तोत्रसंहिता 55 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 55
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 55:12-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ