YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 5:3-8

स्तोत्रसंहिता 5:3-8 MARVBSI

हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस; सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन, आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. कारण तू दुष्टाईची आवड धरणारा देव नाहीस; दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही. तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत, सर्व कुकर्म करणार्‍यांचा तुला तिटकारा आहे. असत्य भाषण करणार्‍याचा तू नाश करतोस; खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन; तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन. हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या नीतिमार्गाने ने, आपला मार्ग माझ्यापुढे नीट कर.