अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा; उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा. कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे; तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. तो लोकांना आमच्या ताब्यात देतो; तो राष्ट्रांना आमच्या पायांखाली घालतो. त्याच्या आवडत्या याकोबाला ज्या वतनाचा अभिमान होता, ते त्याने आमच्यासाठी निवडले आहे. (सेला) जयघोष होत असता देव वर गेला आहे, कर्ण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा; आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा. देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे; देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे. राष्ट्रांतले अधिपती जमले आहेत; अब्राहामाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत; तो परमथोर आहे.
स्तोत्रसंहिता 47 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 47
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 47:1-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ