हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसांत, पुरातन काळी, तू जे कार्य केलेस त्याचे वर्णन त्यांनी केले, व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले. तू आपल्या हाताने राष्ट्रांना घालवून तेथे ह्यांना स्थापले; त्या लोकांना क्लेश देऊन ह्यांचा विस्तार केला. ह्यांनी आपल्या तलवारीने देशाची मालकी मिळवली असे नाही, ह्यांच्या बाहुबलाने ह्यांना विजयप्राप्ती झाली असेही नाही, तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुखतेज ह्यांनी ती झाली, कारण ह्यांच्यावर तुझी कृपादृष्टी होती.
स्तोत्रसंहिता 44 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 44
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 44:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ