YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 44:1-3

स्तोत्रसंहिता 44:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे परमेश्वरा, प्राचीन काळी तुम्ही आमच्या पूर्वजांच्या दिवसांत केलेल्या कार्याचे वर्णन त्यांनी आम्हाला सांगितले आणि आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे. तुम्ही आपल्या हातांनी राष्ट्रांना घालवून दिले आणि तिथे आमच्या पूर्वजांना स्थापित केले; तुम्ही त्या लोकांना चिरडले आणि आमच्या पूर्वजांना समृद्ध केले. त्यांच्या तलवारीने त्यांनी हा देश जिंकला नाही, आणि त्यांच्या बाहुबलाने त्यांना विजयी केले असेही नाही; हे तुमच्या उजव्या हाताने, तुमच्या भुजांनी आणि तुमच्या मुखप्रकाशाने हे केले, कारण तुम्ही त्यांच्यावर प्रीती केली.