YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 39:6-11

स्तोत्रसंहिता 39:6-11 MARVBSI

खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगाच धामधूम करतो, तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही. तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्याच ठायी आहे. माझ्या सर्व अपराधांपासून मला सोडव; मला मूर्खांच्या निंदेस पात्र करू नकोस. मी मौन धरले आहे, आपले तोंड उघडत नाही, कारण हे तूच केले आहेस. तुझा प्रहार माझ्यावरून दूर कर; तुझ्या हाताच्या तडाख्याने माझा क्षय होत आहे. तू मनुष्याला अनीतीबद्दल धमकावून शासन करतोस, तेव्हा तू त्याचे सौंदर्य पतंगाप्रमाणे विलयास नेतोस; खरोखर सर्व माणसे श्वासवत आहेत. (सेला)