स्तोत्रसंहिता 39:6-11
स्तोत्रसंहिता 39:6-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगाच धामधूम करतो, तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही. तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्याच ठायी आहे. माझ्या सर्व अपराधांपासून मला सोडव; मला मूर्खांच्या निंदेस पात्र करू नकोस. मी मौन धरले आहे, आपले तोंड उघडत नाही, कारण हे तूच केले आहेस. तुझा प्रहार माझ्यावरून दूर कर; तुझ्या हाताच्या तडाख्याने माझा क्षय होत आहे. तू मनुष्याला अनीतीबद्दल धमकावून शासन करतोस, तेव्हा तू त्याचे सौंदर्य पतंगाप्रमाणे विलयास नेतोस; खरोखर सर्व माणसे श्वासवत आहेत. (सेला)
स्तोत्रसंहिता 39:6-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो, खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो, पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार. हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू? तूच माझी एक आशा आहेस! माझ्या अपराधांवर मला विजय दे, मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको. मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही. कारण हे तुच केले आहेस. मला जखमा करणे थांबव, तुझ्या हाताच्या माराने मी क्षीण झालो आहे. जेव्हा तू लोकांस पापांबद्दल शिकवण करतोस. कसरीप्रमाणे तू त्यांची शक्ती खाऊन टाकतो. खचित सर्व मनुष्य फक्त वाफ आहेत. (सेला)
स्तोत्रसंहिता 39:6-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
निश्चितच प्रत्येकजण खरोखर सावलीप्रमाणेच जगतो; संपत्ती गोळा करण्याची त्याची सर्व धावपळ ही निरर्थकच, याचा उपभोग कोण घेईल हे त्याला ठाऊक नाही. तर प्रभू, मी आता कोणत्या गोष्टींची प्रतीक्षा करू? माझी सर्व आशा तुमच्या ठायी आहे. माझ्या पातकांपासून माझे रक्षण करा; मला मूर्खांच्या थट्टेचा विषय होऊ देऊ नका. मी शांत राहिलो; मी माझे तोंड उघडले नाही, कारण तुम्हीच हे केले आहे. तुमचा चाबूक माझ्यापासून दूर करा; तुमच्या हाताच्या प्रहाराने मी म्लान झालो आहे. तुम्ही मनुष्याला त्याच्या पापाबद्दल फटके मारून शिस्त लावता, त्याचे ऐश्वर्य कसर लागलेल्या वस्त्रांप्रमाणे निकृष्ट करता; निश्चितच मनुष्य खरोखर केवळ श्वासमात्र आहे. सेला