YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 16

16
उत्तम वारसा
दाविदाचे मिक्ताम नावाचे स्तोत्र.
1हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे.
2मी परमेश्वराला म्हटले, “तूच माझा प्रभू आहेस, तुझ्यापरते मला सुख नाही.”
3पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत, त्यांच्या ठायी माझा सगळा संतोष आहे.
4जे परमेश्वराला सोडून अन्य दैवताच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दु:खे होतील; ते रक्तमय पेयार्पणे अर्पण करतात तशी मी अर्पण करणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नांवे उच्चारणारही नाही.
5परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे; माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.
6माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे.
7परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो; माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते.
8मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.
9म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उल्लासतो; माझा देहही सुरक्षित राहतो.
10कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस;
11जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 16: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन