हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; त्याची थोरवी अगम्य आहे. एक पिढी दुसर्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील. तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुत कृत्ये ह्यांचे मी मनन करीन. तुझ्या भयावह कृत्यांचा पराक्रम लोक विदित करतील; मी तुझी थोरवी वर्णन करीन. ते तुझ्या परमदयेची आठवण काढतील; व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करतील.
स्तोत्रसंहिता 145 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 145
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 145:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ