YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 143:7-12

स्तोत्रसंहिता 143:7-12 MARVBSI

हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक; माझा आत्मा गळून गेला आहे; तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नकोस; लपवशील तर मी गर्तेत उतरणार्‍यांसारखा होईन. प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे; कारण तुझ्यावर माझा भाव आहे; ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळव कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लावले आहे. हे परमेश्वरा, माझ्या वैर्‍यांपासून मला मुक्त कर; मी तुझ्या पाठीशी येऊन लपलो आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव; कारण तू माझा देव आहेस; तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेवो. हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी मला नवजीवन दे; तू आपल्या न्यायाने माझा जीव संकटांतून बाहेर काढ. तू आपल्या दयेने माझ्या वैर्‍यांचा नायनाट कर; माझ्या जिवाला गांजणार्‍या सर्वांचा नाश कर; कारण मी तुझा दास आहे.