स्तोत्रसंहिता 124
124
शत्रूंच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे आरोहणस्तोत्र.
1आता इस्राएलाने म्हणावे की, जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता,
2लोक आमच्यावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता,
3तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला त्या वेळी त्यांनी आम्हांला जिवंत गिळून टाकले असते;
4जलांनी आम्हांला बुडवले असते; त्यांचा लोंढा आमच्या गळ्याशी आला असता;
5खवळलेले लोंढे आमच्या गळ्याशी आले असते.
6परमेश्वराचा धन्यवाद होवो; त्याने आम्हांला त्यांच्या दाढांत भक्ष्य म्हणून पडू दिले नाही.
7आमचा जीव पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशांतून मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.
8आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हांला साहाय्य मिळते.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 124: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.