YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 118:1-14

स्तोत्रसंहिता 118:1-14 MARVBSI

परमेश्वराचे उपकारस्मरण करा कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सनातन आहे. आता इस्राएलाने म्हणावे की, “त्याची दया सनातन आहे.” अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की, “त्याची दया सनातन आहे.” परमेश्वराचे भय धरणार्‍यांनी म्हणावे की, “त्याची दया सनातन आहे.” अडचणीत असताना मी परमेशाचा धावा केला; तो ऐकून परमेशाने मला प्रशस्त स्थळी नेले. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? माझा साहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; माझा द्वेष करणार्‍यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन. मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला घेरले आहे; खरोखर मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला मधमाश्यांप्रमाणे घेरले आहे; काट्याकुट्यांच्या आगीप्रमाणे ते विझून जातील, परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. मी पडावे म्हणून तू मला जोराने धक्का दिलास, पण परमेश्वराने मला सावरले. परमेश माझे बल व माझे गीत आहे; तो माझे तारण झाला आहे.