हे परमेश्वरा, आमचे नको, आमचे नको, तर आपल्या नावाचा गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस. “ह्यांचा देव कोठे आहे;” असे राष्ट्रांनी का म्हणावे? आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो. त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत; त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही; त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; त्यांना नाक आहे पण वास येत नाही; त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही; पाय आहेत पण चालता येत नाही; त्यांच्या कंठांतून शब्द निघत नाही. त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.
स्तोत्रसंहिता 115 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 115
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 115:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ