YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 10

10
दुष्टाचे पतन व्हावे म्हणून प्रार्थना
1हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस? संकटसमयी दृष्टिआड का होतोस?
2दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो; ज्या क्लृप्त्या ते योजतात त्यांतच ते सापडोत.
3कारण दुर्जन आपल्या मनातील हावेची शेखी मिरवतो; लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो.
4दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही;” “देव नाही” असेच त्याचे सर्व विचार असतात.
5त्याच्या युक्त्या सर्वदा सिद्धीस जातात; तुझे निर्णय त्याच्या अगदी दृष्टीपलीकडे उच्च असे असतात; तो आपल्या सर्व शत्रूंवर फूत्कार टाकतो.
6तो आपल्या मनात म्हणतो की, “मी ढळणार नाही, मी पिढ्यानपिढ्याही विपत्तीत पडणार नाही.”
7त्याच्या तोंडी शाप, कपट व जुलूम सदैव आहेत; त्याच्या जिभेवर उपद्रव व दुष्टाई आहेत.
8गावातील दडण्याच्या ठिकाणी तो दबा धरून बसतो; गुप्त स्थळी तो निरपराध्याचा घात करतो; त्याचे डोळे लाचारासाठी टपलेले असतात.
9जाळीत जसा सिंह तसा तो गुप्त स्थळी टपून बसतो; दीनाला आपल्या जाळ्यात ओढतो आणि धरतो.
10लाचाराचा चुराडा होऊन तो वाकून जातो, आणि त्याच्या बळकट पंजांत तो सापडतो.
11तो आपल्या मनात म्हणतो की, “देवाला विसर पडला आहे, त्याने आपले तोंड लपवले आहे, तो हे कधीच पाहणार नाही.”
12हे परमेश्वरा, ऊठ; हे देवा, आपला हात उगार; दीनांना विसरू नकोस.
13देवाला दुर्जन का तुच्छ मानतो? “तू झडती घेणार नाहीस” असे तो आपल्या मनात का म्हणतो?
14तू हे पाहिलेच आहे, उपद्रव व दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस; लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; पोरक्यांचा साहाय्यकर्ता तू आहेस.
15दुर्जनाचा बाहू मोडून टाक; दुष्टाचे दुष्कर्म निःशेष होईपर्यंत त्याचा पिच्छा पुरव.
16परमेश्वर युगानुयुग राजा आहे; त्याच्या देशातून राष्ट्रे नष्ट झाली आहेत.
17हे परमेश्वरा, तू दीनांचा मनोरथ पूर्ण केला आहेस; त्यांचे मन तू स्थिर करतोस;
18पोरक्यांना व पीडितांना न्याय मिळावा आणि मातीपासून घडलेल्या मनुष्याने त्यांना आणखी दहशत घालू नये म्हणून तू त्यांच्याकडे कान देतोस.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 10: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन