ज्ञानाने आपले घर बांधले आहे; त्याने आपले सात खांब तयार केले आहेत. त्याने आपले पशू कापले आहेत; त्याने आपला द्राक्षारस मिसळला आहे, आपले मेजही वाढून तयार केले आहे. त्याने आपल्या दासी पाठवल्या आहेत, ते नगराच्या उच्च स्थानांवरून ओरडून म्हणते, “जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो;” जो बुद्धिहीन आहे त्याला ते म्हणते, “ये, माझी भाकर खा; आणि मी मिसळलेला द्राक्षारस पी. भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा; आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला.”
नीतिसूत्रे 9 वाचा
ऐका नीतिसूत्रे 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 9:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ