नीतिसूत्रे 9:1-6
नीतिसूत्रे 9:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्ञानाने आपले घर बांधले आहे; त्याने आपले सात खांब तयार केले आहेत. त्याने आपले पशू कापले आहेत; त्याने आपला द्राक्षारस मिसळला आहे, आपले मेजही वाढून तयार केले आहे. त्याने आपल्या दासी पाठवल्या आहेत, ते नगराच्या उच्च स्थानांवरून ओरडून म्हणते, “जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो;” जो बुद्धिहीन आहे त्याला ते म्हणते, “ये, माझी भाकर खा; आणि मी मिसळलेला द्राक्षारस पी. भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा; आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला.”
नीतिसूत्रे 9:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्ञानाने आपले स्वतःचे घर बांधले; त्यामध्ये तिने खडकाचे सात खांब कोरून तयार केले. तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशू तयार केले आहेत; तिने आपला द्राक्षरस मिसळला आहे; आणि तिने मेजही वाढून तयार केले आहे, तिने अन्न तिच्या मेजावर ठेवले आहे. तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि ते नगराच्या उंचस्थानांच्या टोकापासून हाक मारून म्हणतेः “जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!” ती जे बुद्धिहीन आहेत त्यांना म्हणते. “या, माझे अन्न खा. आणि मी मिसळलेला द्राक्षरस प्या. तुमचे अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत रहा; सुज्ञानाच्या मार्गाने चला.”
नीतिसूत्रे 9:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सुज्ञानाने आपले घर बांधले आहे; तिने तिचे सात खांब तयार केले आहेत. तिने तिच्याकडील मांसाहारी भोजन आणि तिचा द्राक्षारस तयार केला आहे; तिने तिचा मेजसुद्धा सजविलेला आहे. तिने तिच्या दासांना बाहेर पाठवले आहे आणि ती नगराच्या सर्वात उच्च स्थानावरून हाक मारते, “जे साधे भोळे आहेत, त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते, “इकडे या, माझे भोजन खा आणि मी मिसळलेला द्राक्षारस प्या. तुमचे साधेभोळेपण सोडून द्या म्हणजे तुम्ही जगाल; अंतर्ज्ञानाच्या मार्गाने चला.”