YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 31:25-31

नीतिसूत्रे 31:25-31 MARVBSI

बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत, ती पुढील काळाविषयी निश्‍चिंत राहते. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिव्हेच्या ठायी दयेचे शिक्षण असते, ती आपल्या कुटुंबाच्या आचारविचारांकडे लक्ष देते, ती आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो : “बहुत स्त्रियांनी सद्‍गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस.” सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणार्‍या स्त्रीची प्रशंसा होते. तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.