लमुएल राजाची वचने म्हणजे त्याच्या आईने त्याला शिकवलेली देववाणी : माझ्या मुला, मी काय सांगू? माझ्या पोटच्या मुला, मी काय सांगू? माझ्या नवसाच्या मुला, मी काय सांगू? तू आपले वीर्य स्त्रियांना देऊ नकोस; आपले मन राजांचा नाश करणार्यांना वश होऊ देऊ नकोस. हे लमुएला, द्राक्षारस पिणे राजांना शोभत नाही, राजांना ते नाही शोभत; मद्य कुठे आहे असे विचारणे सरदारांना शोभत नाही. ते मद्य प्याले तर नियमशास्त्र विसरून पिडलेल्यांचा न्याय विपरीत करतील. मरणाच्या लागास आलेल्यास मद्य दे, खिन्न मनाच्या मनुष्यास द्राक्षारस दे. त्याने ते पिऊन आपली विपत्ती विसरावी, त्याच्या हालांचे त्याला विस्मरण व्हावे.
नीतिसूत्रे 31 वाचा
ऐका नीतिसूत्रे 31
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 31:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ