YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 3:14-23

नीतिसूत्रे 3:14-23 MARVBSI

कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे; आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही. त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे; त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत; त्याचे मार्ग आनंदाचे आहेत; त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. जे त्याला धरून राहतात त्यांना ते जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य होय. परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला; त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले. त्याच्या ज्ञानबलाने जलाशय बाहेर आले, व आकाश दहिवर वर्षते. माझ्या मुला, ती तुझ्या डोळ्यांआड होऊ देऊ नकोस; तू चातुर्य व विवेक ही सांभाळून ठेव. म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील. तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही.