YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 3:13-18

नीतिसूत्रे 3:13-18 MARVBSI

ज्याला ज्ञान प्राप्त होते, तो सुज्ञता संपादन करतो, तो मनुष्य धन्य होय. कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे; आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही. त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे; त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत; त्याचे मार्ग आनंदाचे आहेत; त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. जे त्याला धरून राहतात त्यांना ते जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य होय.