पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळणारे ठिपके, व कटकटी बायको ही सारखीच आहेत; तिला आवरणारा म्हणजे वार्याला आवरणारा होय; त्याच्या उजव्या हाताला तेल लागल्यासारखे होते. तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्रांचा चेहरा पाणीदार करतो. जो अंजिराचे झाड राखतो तो त्याचे फळ चाखतो; जो आपल्या धन्याच्या सेवेला जपतो त्याचा मान होतो. जसे पाण्यात मुखाचे प्रतिबिंब हुबेहूब दिसते तशी मनुष्यांची हृदये परस्परांची प्रतिबिंबे होत. अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत; आणि मनुष्याचे नेत्रही कधी तृप्त होत नाहीत. रुप्यासाठी मूस व सोन्यासाठी भट्टी, तशी मनुष्यासाठी प्रशंसेची कसोटी होय. कुटलेल्या धान्याबरोबर मूर्खाला उखळात घालून मुसळाने कुटले, तरी त्याची मूर्खता त्याला सोडणार नाही. तू आपल्या शेरडामेंढरांची स्थिती पाहत जा; आपल्या कळपांवर चांगली नजर ठेव; कारण संपत्ती सदा टिकत नाही; राजमुकुट तरी पिढ्यानपिढ्या टिकेल काय? वाळलेले गवत जाऊन त्या जागी कोवळे गवत उगवते, डोंगरांवरील हिरवळ कापून गोळा करतात. वस्त्रांसाठी कोकरे आहेत; बकर्या शेताचे मोल आहेत; तुझ्या व तुझ्या घराण्याच्या अन्नापुरते, आणि तुझ्या दासींच्या पोषणापुरते शेळ्यांचे दूध तुझ्याजवळ आहे.
नीतिसूत्रे 27 वाचा
ऐका नीतिसूत्रे 27
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 27:15-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ