नीतिसूत्रे 27:15-27
नीतिसूत्रे 27:15-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळणारे ठिपके, व कटकटी बायको ही सारखीच आहेत; तिला आवरणारा म्हणजे वार्याला आवरणारा होय; त्याच्या उजव्या हाताला तेल लागल्यासारखे होते. तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्रांचा चेहरा पाणीदार करतो. जो अंजिराचे झाड राखतो तो त्याचे फळ चाखतो; जो आपल्या धन्याच्या सेवेला जपतो त्याचा मान होतो. जसे पाण्यात मुखाचे प्रतिबिंब हुबेहूब दिसते तशी मनुष्यांची हृदये परस्परांची प्रतिबिंबे होत. अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत; आणि मनुष्याचे नेत्रही कधी तृप्त होत नाहीत. रुप्यासाठी मूस व सोन्यासाठी भट्टी, तशी मनुष्यासाठी प्रशंसेची कसोटी होय. कुटलेल्या धान्याबरोबर मूर्खाला उखळात घालून मुसळाने कुटले, तरी त्याची मूर्खता त्याला सोडणार नाही. तू आपल्या शेरडामेंढरांची स्थिती पाहत जा; आपल्या कळपांवर चांगली नजर ठेव; कारण संपत्ती सदा टिकत नाही; राजमुकुट तरी पिढ्यानपिढ्या टिकेल काय? वाळलेले गवत जाऊन त्या जागी कोवळे गवत उगवते, डोंगरांवरील हिरवळ कापून गोळा करतात. वस्त्रांसाठी कोकरे आहेत; बकर्या शेताचे मोल आहेत; तुझ्या व तुझ्या घराण्याच्या अन्नापुरते, आणि तुझ्या दासींच्या पोषणापुरते शेळ्यांचे दूध तुझ्याजवळ आहे.
नीतिसूत्रे 27:15-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पावसाच्या दिवसात सतत गळणारे ठिपके, भांडखोर पत्नी सारखीच आहेत. तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वाऱ्याला ताब्यात ठेवण्यासारखे आहे, किंवा आपल्या हातात तेल पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणे. लोखंड लोखंडाला धारदार करते; तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा धारदार करतो. जो कोणी अंजिराच्या झाडाची निगा राखतो तो त्याचे फळ खाईल. आणि तसेच जो कोणी आपल्या धन्याचे रक्षण करतो त्याचा मान होईल. जसे पाण्यात मनुष्याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब जशाचे तसे दिसते, तसेच मनुष्याचे हृदय मनुष्याचे प्रतिबिंब दाखविते. मृतलोक आणि विनाशस्थान ही कधीही तृप्त होत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याचे डोळे कधी तृप्त होत नाही. रुप्यासाठी मूस आणि सोन्यासाठी भट्टी आहे; आणि तसे मनुष्याची स्तुतीने पारख केली जाते. जरी तू मूर्खाला कुटलेल्या धान्याबरोबर उखळात घालून मुसळाने कुटले, तरी त्याची मूर्खता त्याच्यापासून जाणार नाही. तू आपल्या शेरडामेंढरांना एकत्र जमून त्यांची स्थिती जाणून खात्री कर. आणि आपल्या कळपाकडे नीट लक्ष दे. संपत्ती कायम टिकत नाही. मुकुट तरी सर्व पिढ्यानपिढ्या टिकेल काय? गवत जाते आणि पुन्हा नवीन उगवते. आणि डोंगरावरील हिरवळ कापून गुरांढोरासाठी गोळा करण्यात येते. वस्त्रासाठी कोकरे आहेत, आणि बकरे शेताचे मोल आहेत. बकरीचे दूध तुझ्या खाण्यासाठी व तुझ्या घरच्यांच्या खाण्यासाठी, आणि तुझ्या दासींच्या पोषणापुरते तुझ्याजवळ आहे.
नीतिसूत्रे 27:15-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
भांडखोर पत्नी ही पावसाळ्यात गळक्या छप्परासारखी आहे. तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वार्याला ताब्यात ठेवण्यासारखे, किंवा हाताने तेल धरण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. जशी लोखंडाने लोखंडाला धार लागते, त्याप्रमाणे एक मनुष्य दुसर्याला सुधारतो. जो अंजिराच्या झाडाची राखण करतो, तो त्या झाडाचे फळ खाईल. आणि जे त्यांच्या मालकाचे संरक्षण करतात त्यांचा सन्मान होईल. पाणी जसे चेहर्याचे प्रतिबिंब दर्शविते, तसेच व्यक्तीचे जीवन त्याचे अंतःकरण दर्शविते, मृत्यू आणि विध्वंस यांचे कधीही समाधान होत नाही, तसेच मनुष्याच्या नेत्रांचेही नव्हे. चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, तशी लोकांची पारख, त्यांच्या प्रशंसेद्वारे होते. मूर्खाचा तुम्ही कुटणीमध्ये भुगा केला, मुसळात त्याला धान्यासारखे भरडले, तरी त्याची मूर्खता तुम्हाला वेगळी करता येणार नाही. आपल्या कळपाच्या स्थितीची योग्य जाणीव ठेवा, तुमच्या पशूंकडे काळजीपूर्वक लक्ष द्या; कारण संपत्ती सर्वकाळ टिकत नाही, आणि मुकुट पिढ्यान् पिढ्या सुरक्षित नसतो. वाळलेले गवत काढून टाकले तेव्हा नवीन वाढ दिसून येते आणि टेकड्यांवरील गवत एकत्रित केले जाते, तेव्हा मेंढ्या तुम्हाला कपडे पुरवतील, आणि शेतातील पैशाने शेळ्या मिळतील. तुझ्या कुटुंबाला खाण्यासाठी आणि तुझ्या दासींचे पोषण करण्यासाठी तुझ्याकडे शेळ्यांचे पुष्कळ दूध असेल.