YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 2:12-20

नीतिसूत्रे 2:12-20 MARVBSI

म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणार्‍या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील; ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गांनी चालतात; त्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो, दुष्कर्माच्या कुटिलतेवरून ते उल्लास पावतात; त्यांचे मार्ग वाकडे आहेत, त्यांच्या वाटा विपरीत आहेत. परस्त्रीपासून, मोहक भाषण करणार्‍या परस्त्रीपासून, ज्ञान तुझा बचाव करील; तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडला आहे, ती आपल्या देवाचा करार विसरली आहे; तिच्या घरातून मृत्युमुखाकडे वाट आहे, तिच्या वाटा मेलेल्यांकडे जातात; जे तिच्याकडे जातात त्यांच्यातून कोणी परत येत नाही, त्यांना जीवनाचे मार्ग साधत नाहीत; ह्यास्तव तू भल्यांच्या मार्गाने चालावे व नीतिमानांच्या रीतीचे अवलंबन करावे.